बोधकथा-२

वेळेची किंमत

                               एक फार मार्मिक कथा आहे̱. ग्रॅहम बेल यांच्या दुकानात पुस्तकाच्या दुकानात एकदा एक ग्राहक आला.त्याला एक पुस्तक खरेदी करायचे होते. बेल यांनी दुकानात एक पाटी लावली होती.' एकच किंमत',गिऱ्हाईकाने पुस्तक निवडले आणि किंमत विचारली,बेलने सांगितले.'दोन डॉलर'̱. गिऱ्हाईकाने विचारले.काही कमी नाही करणार का? बेलने काही न बोलता पाटीकडे बोट दाखवले! पण तो ग्राहक पुन्हा म्हणाला,अहो,दहा टक्के सूट तर सर्वच दुकानदार देतात.तुम्ही पुस्तक कितीला देणार ते सांगा! बेल म्हणाला,  "आता या पुस्तकाची किंमत आहे दोन डॉलर आणि दहा सेंट." गिऱ्हाईक आश्चर्याने म्हणाले,"अहो आताच तुम्ही दोन डॉलर म्हणालात,लगेच वाढली कशी? ग्रॅहम बेल म्हणाले,"मित्रा,दोन डॉलर ही या पुस्तकाची किंमत आहे आणि दहा सेंट ही तू माझ्या घेतलेल्या दोन मिनीटांची किंमत आहे‍र तू अजून उशीर लावशील तर पुस्तकांची किंमत आणखी वाढत जाईल!" त्या ग्राहकाने निमूटपणे वाढलेली किंमत दिली आणि पुस्तक घेऊन बाहेर पडला!

तात्पर्य: वेळ ही पैशाइतकीच मौल्यावान वस्तू आहे.तिची उधळपट्टी करू नये.

-दोन्ही बोधकथा दै. संध्याकाळमधून