एकदा फळ भाज्यांची सभा भरली
प्रत्येकाने आप-आपली स्तुती गायली
काकडी म्हणाली,
मी कधी सरळ कधी वाकडी
सगळ्यांत थंड आहे मी एकटी
गाजर म्हणाला,
रंग माझा सगळ्यांत सुंदर
माझ्यामुळे स्वच्छ होते नजर
बीट म्हणाला,
भोवर्याच्या आकाराचा मी बीट
माझ्यामुळे राहतात सगळे फिट
टोमॅटो म्हणाले,
माझा रंग आहे लालेलाल
माझ्यामुळे होतात गुलाबी गाल
कांदा म्हणाला,
मी आहे जरासा तिखट
खवून मला चव जाते फिकट
मुळा म्हणाला,
माझा रंग स्वच्छ, सफेद
मला खाताना कसला खेद?
सगळ्यांची मग गट्टी झाली
कोशिंबीर नावाची टीम त्यांनी केली.