विचार आणि चमत्कार.

 चमत्कार

                                             लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक  बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले  अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

आपला

कॉ.विकि