मध्य प्रदेश पोलींसांचे अभिनंदन.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरीचशी लग्ने होतात, परंतू मध्य प्रदेशातल्या सागर, बामनौर येथील एक दलित युवक स्वतःच्या लग्नाच्या वरातीत चक्क घोडीवर बसला होता. लग्नामध्ये घोडीवर बसण्याचा हक्क फक्त उच्चवर्णीयांचा आहे, त्यांमुळे त्याला बराचसा विरोध झाला, लग्नावर बहिष्कार टाकण्यात आला, धमक्या देण्याचे प्रकार झाले. परंतु पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे हा विवाह सुरळीत पार पडला.

http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20070009414

लग्नामध्ये घोडीवरचं नव्हे तर इतर कोणत्याही वाहनावर बसलेल्या दलित व्यक्तीने उच्चवर्णीयांसमोर वाहनावरून खाली उतरून चालावे असा येथील दंडक आहे असे NDTV पाहताना कळले.

मध्य प्रदेश पोलिसांनी या विवाहाला मदत करून एकप्रकारे मान्यता दिली आहे. त्यामुळे ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. गावकऱ्यांनी जरी बहिष्कार टाकलेला असला तरीदेखील नवीनं दांपत्याचा संसार सुखाचा व्हावा एव्हढीच प्रार्थना.