माझा तर दीवसही
तुच आणि रात्रही तुच
मनाला देते जी जखमां
ती वेदनाही तुच
माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच
आणि माझा शेवटही तुच
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द
तो आवजही तुच
बदलतेय दुनीया
बदलतोय जमाना
माझ्या या तुटलेल्या ह्रुदयाचा
काही वेगळाच तराना
जिच्यावर केल होत
कधी मनापासुन प्रेम मी
आजही माझ्या स्वप्नातली
ती परीही तुच
कधी आपलसं केलस
कधी केलस परकं
कधी जवळही नाही दिसलीस
तर कधि सावली सारखी
पाठ नाही सोडलीस
जिंकलीही तुच आणि
हरलीही तुच
तो खेळ माझ्या आयुष्याचा
केलासही तुच
माझ्या स्वप्नही तुच
आणि ध्येयहि तुच
ज्याने उध्वस्त केलं
माझ्या स्वप्नांच घर
ते वादळही तुच
तु माझी आहेस ???? कि तु माझी नाहि ????
असं का वाटतय.......!!
का मनाला पडलेला हा प्रश्नही तुच.....???@ सचिन काकडे [जुन २०,२००७]