'शिवार'

कुणी म्हणाले,
हिणवत मजला-
"तुझ्या घराला
जराही कसे
अंगण नाही?"...

म्हटले त्यांना-
"शिवार माझे
आहे मोठे;
परंतु त्याला
कुंपण नाही!"...