कुठे?कोणता दिवस?
दिवसामागून येणारा दिवस
येतो आणि जातो
काहींचे भाग्य विशेष म्हणून गाजतो!
स्वातंत्र्यदिन, गांधीजयंती
तसेही येतात आणि जातात
पेपरात कोपऱ्यात नोंद येते
पुतळ्याला हाराचा भार होतो
असलेल्याला सोडून मेलेल्याचे
कौतुक करण्याचा प्रघात बरा आहे
माणसे गोड तरी बोलतात
सुटीचा आनंद घेतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या
मदर्स डे, टिचर्स डे
एक दिवस मोठा गाजावाजा
पर्यावरण दिन, मानवता दिवस
गेला दिवस, सारे विसरून जा
दिवसांचे काय एवढे मोठे?
दिवस येतात.. जातात
पत्ताही लागणार नाही
अंधाराला दिव्याचा प्रकाश दिसणार नाही
कालही असाच एक ड्रग डे होता म्हणे!...
.......
म्हणूनच लिहायला उशीर झालाय.............