आता मी जगायला शिकलोय.....


मी प्यायला कधी शिकलो ?
मी जगायला कधी शिकलो?

जेव्हा सगळी स्वार्थी
मैफ़िल तुझ्यासोबत उठली
तेव्हाच माझ्या आयुष्यातली
पहीली बाटली फ़ुटली

आठवतं....?
तु म्हणायचीस.........
"ही जन्मोजन्मीची साथ अपुली "
मग ती साथ काही
क्षणातच कशी सुटली ?

आठवतयं का...?
"आयुष्यभर प्रेमाच्या याच वाटेवर फ़क्त
तुझ्यासोबत चालेन"
असं म्हणाली होतीस
मग आता ती वाट कुठे चुकली?
मी बरोबर असतानाही तु का दुसरी वाट शोधलीस?

लोकं म्हणतात "स्वप्न पुर्ण होतात"
पण आमची पहाटेची ही स्वप्न तुटली

पण आता,

तुझ्या सारखा आता मीही बदललोय
तु दिलेल्या वेदना आता पुर्णपणे विसरलोय
तु दिलेल्या धक्क्यातुन आता हळु हळु सावरलोय
तुझ्यासाठी हरणारा मी आता स्वत:साठी जिंकलोय

तुला इतिहास जमा करुन
आता मी प्यायला शिकलोय.........
दुनिया भले काहीही म्हणु दे
पण आता मी जगायला शिकलोय.......
आता मी जगायला शिकलोय..... @सचिन काकडे [जुन २९,२००७]