शेवटी जिवन असचं असतं
का हा नुसताच भास आहे
स्पर्श करायला गेलं फुलांना
मग का काट्यांचा त्रास आहे
शेवटी जिवन असचं असतं
वेग धरलाय श्वासांनी
धावतोय मी बेफाम
थकलोय कुठे प्रवासानी
शेवटी जिवन असचं असतं
धावपळ ही कश्यासाठी
लाकडाचा गुणधर्म कळला
हाती जशी आली काठी
शेवटी जिवन असचं असतं
कधी नफा, कधी तोटा आहे
व्यापार कळला नाही त्यांना
ज्यांचा दाम खोटा आहे
शेवटी जिवन असचं असतं
कुटुंबासाठी दूर वसावं लागतं
"कसा आहेस" विचारल्यावर
अश्रूं गिळून हसावं लागतं
शेवटी जिवन असचं असतं
मी वेगात चाललो आहे
संवाद माझा साऱ्यांशी
माझ्याशी कुठे बोललो आहे
शेवटी जिवन असचं असतं
मन मारून जगावं लागतं
देवालाही काही देऊ करून
सुख मागावं लागतं
शेवटी जिवन असचं असतं
चमकतो कधी भाग्याचा तारा
पण, आयुष्य नशीबावर लादणं
मग होतो खेळ खंडोबा सारा
शेवटी जिवन असचं असतं
स्वप्नांनाही कधी तडा जातो
पुन्हा भानावर येण्यासाठी
वास्तवाशी लढा होतो
शेवटी जिवन असचं असतं
तडजोड ही करावीच लागते
नियतीच्या व्यापारा पुढे
फाटकी ओंजळ धरावी लागते
शेवटी जिवन असचं असतं
मी जळतोय कापूर होऊन
वाटलं का निघावं इथून
एखादाही अवशेश ठेवून
शेवटी जिवन असचं असतं
उधान सागराचा पहारा
परततात आठवणींच्या लाटा
मनाचा व्यापून किनारा
शेवटी जिवन असचं असतं
हाताच्या फोडासारखं जपतोय
आजही मला कळत नाही
मी नक्की कशासाठी खपतोय
शेवटी जिवन असचं असतं
कधीतरी राख होणेचं आहे
कोणाच्या तरी आठवणीत
फिनीक्साचा जन्म घेणेच आहे
शेवटी जिवन असचं असतं
काट्यांची इथे नाही कदर
संरक्षण करतात फुलांची
तरी नींदा हरेक ओठांवर
शेवटी जिवन असचं असतं
जगतात सगळे आहे
फक्त प्रत्येकाच्या जिवनशैलीचे
नाव वेगवेगळे आहे
शेवटी जिवन असचं असतं
मातीचं करणं सोनचं आहे
कोंब देऊन त्या मातीला
शेवटी मातीचं होणचं आहे
शेवटी जिवन असचं असतं
प्रवास परतीचा आहे
खाली अवशेष ठेवून
जाणं वरतीच आहे
शेवटी जिवन असचं असतं
पोटासाठी जगणं आहे
पोट भरल्यावर पुन्हा
उद्याच्या चिंतेत जागणं आहे
@सनिल पांगे