आता जगण्याचा बहाणा शोधतोय...............

आयुष्याशी नवं नातं जोडतोय
आनंदाचे चार क्षण शोधतोय
मरण्याच्या ईच्छेने खुप जगलोय
आता जगण्याचा बहाणा शोधतोय...............

त्याच त्याच प्रश्नांनी मनालाही त्रास होतोय
ते गेलेले दिवस आठवण्याचा प्रयत्न करतोय
मनाच्या सागरातल्या लहरींचा पदर तरीही
सारखा अलगद किना-याला शिवतोय
त्या वेड्या मनाला भुलवण्याचा प्रयत्न करतोय
आता जगण्याचा बहाणा शोधतोय...............

आता स्वप्न सजवायची ईच्छा नाही
खेळ सावल्यांचा पुन्हा खेळायचा नाही
भेटणं तर नशीबाच्या हातात आहे
आता त्या नशीबालाही दोष द्यायचा नाही
मनाच्या जखमां भरायचा प्रयन्त करतोय
आता जगण्याचा बहाणा शोधतोय...............
आता जगण्याचा बहाणा शोधतोय...............

सचिन काकडे [जुलै ०२,२००७]