तुझी नजर अशी काही माझ्या नजरेस मिळव..........
तुझ्या डोळ्यातले सगळे अश्रु माझ्या पापण्यांवर सजव..........
तुझ्या चेह-यावरील उदास भाव मला आवडत नाही
दुख:शी तुझं आत्ताच नातं तुला शोभत नाही
ऎक माझं एवढं तुझ्या चेह-यावरुन त्याला हटव..........
तुझी नजर अशी काही माझ्या नजरेस मिळव..........
तुझ्या डोळ्यातले सगळे अश्रु माझ्या पापण्यांवर सजव..........
शपथ आहे तुला माझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाची
तु माझ्या बरोबरचे ते आनंदाचे क्षण तु आठव..........
तुझं जे दुख: आहे त्यालाही माझ्या पत्त्यावर पाठव..........
तुझी नजर अशी काही माझ्या नजरेस मिळव..........
तुझ्या डोळ्यातले सगळे अश्रु माझ्या पापण्यांवर सजव..........
@सचिन काकडे [जुलै ०६, २००७]