आयुष्यात ज्या ज्या क्षणी एकटेपणाची भावना मनात दाटून येते,
त्या त्या क्षणी जो समोर येतो,
तो माझा प्राणासखा ............. हरविला आहे.
ज्याच्याशी मी खूप बोलू शकतो, ज्याच्यावर खूप प्रेम करू शकतो,
ज्याच्यावर मी खूप रागाऊ शकतो,
तरी ज्याला जवळ घेऊन मी आपला म्हणू शकतो,
तो माझा सुर्हुद ............ हरविला आहे.
ज्याच्यावर रागावातनाही तेवढीच मजा येते जेवढी प्रेम करताना,
ज्याला रडवितानाहि तेवढीच वेदना होते जेवढी रडताना,
ज्याची रुसलेली कळी खुलवणे मला चूटकीसरशी येते,
तो माझा जिवलग ............... हरविला आहे.
ज्याची काळजी लावते मनाला घोर चिंता,
ज्याची दु:खे पळवितात रात्रीची निद्रा,
ज्याच्या एका प्रसन्न झलकेनेच मनाला येते प्रसन्नता,
तो माझा ............... हरविला आहे.