वळणावर सापडलेलं
उंचावरुन आलेलं
अडथळ्यासारखं बसलेलं
पण प्रेमाचं भरतं आणणारं
पाहून सुखावणारं
मनातून उमटलेलं
सारखं पायाशी घुटमळणारं, पण दूर लोटावसं न वाटणारं
कुठवर माझ्याबरोबर येशील?
असं विचारलं की निष्पापपणे हसणारं.
तू पुढे कुठवर जाऊ शकशील? असं मलाच विचारणारं.
एवढंसं, अश्राप सुख.