एक हात

एक हात राखे

सृजन सोहळा

एका हाती आले

तृणाचे औदार्य.

एक हात तृप्त

काळीज साठून

एक हात रिक्त

वांझोटा संभोग.

जाई कुठे क्षण

क्षणाचा ओवाळ

मागे येई पुन्हा

कायमचा वेव्हार.

एक हात वेड

लाभावे मनी

एक हात धड

शहाणा जनी.

एक हात झाले

संसाराचे पाणी

एक हात उरला

बुडत्याचा धनी.

एक हात गीता

सांगे भगवंत

एका हाती चाक

निखळले.