भ्रम असू देत थोडा
सगळिच सत्यं नागडि झाली
तर जड जाईल
जड जाईल जगणं
श्वासही घॆणं जड जाईल
मिमांसा नकोच आता
कशा कशाचीच
येईल सामओरे ते
स्वाहा म्हणुन स्विकार
बिन दिक्कत जग
मुळात " जगायला" शिक.
आता थोडं भान टाकून दे
माथेरानच्या पायथ्याशिच उतरवून ठेव वस्त्रं
अन चपला...
लाल माती लागू दे अंगांगाला.
शरीराला चव घेऊ दे..
पायांना डोळे फ़ुटोत
बोटांना जिभा
रक्त व्हावे मुक्त
भुक लागावी सर्वांगाला
भान...
कशाचेच भान नसावे
...
...
मरणापूर्वी एकदातरी जगावे रे.
एकदा तरी
एकदा तरी बेभान हो.