मात्र रेषा, जाणिवेच्या
अर्थमात्र, सोबतीच्या
सप्तसूर, नादावले
सोवळयाने, सुस्तावले
आसवांचे, गूज झाले
पंखभर, मंदावले
बोलण्याचे, गीत झाले
मात्र रक्त, साखळले
बोल करुणा, बोल भावना
करिता ह्रदय, उष्टावले
दो करांचा देह, प्रथमेचा चंद्रदाह
वस्त्र माझे सावरताना, अंग मात्र नागवले