दिवस उगवेल असाच मावळेलही असाच
घडतील सर्व घटना ठरलेल्या क्षणात
ऋतूमागून ऋतू बदलतील जेव्हा
बदलानुसार बदलायला मी नसेल तेव्हा.
सर्व सोबत असतील आठवणीत रंगतील
मनात जपलेले क्षण भावनांनी उलगडतील
अनावर झाल्यावर भावना शब्द संपतील जेव्हा
कवीता त्यावर करायला मी नसेल तेव्हा.
स्वप्न तु तुझे मला दिले होते
मी ही माझ्या कल्पनेने त्यांना सजवले होते
स्वप्नात त्या तु रंग भरशील जेव्हा
छ्टांमध्ये त्या मी नसेल तेव्हा
ध्येय एकच होते आपल्या दोघांचे
ठरवलेही होते तिथे सोबत पोहोचण्याचे
सर्वांना जिंकुन तु पुढे जाशील तेव्हा
वाटेमध्ये त्या मी नसेल तेव्हा
प्रत्येक वेळी आपण एकमेकांना रागवायचो
शब्दाशब्दांवरुन एकमेकांशी भांडायचो
चिडवायला मला लपुन रहाशील जेव्हा
शोधायला तुला मी नसेल तेव्हा
आठवेल तुला प्रत्येक क्षण मला आठवतोय जसा
जाणवेल तुला त्यावेळी प्राण जातो कसा
आठवणींनी डोळे तुझे भरुन येतील जेव्हा
क्षण तो पहायला मी नसेल तेव्हा
कितीही दुर असले तरीही जवळ तुझ्या असेल
प्रत्यक्षात नसले तरी स्वप्नात मी दिसेन
सर्वांमधे राहुनही तुला एकटे वाटेल जेव्हा
प्रत्येक क्षणी त्या तुझ्यात असेल तेव्हा
-- ही कविता माझी नसून माझ्या महाविद्यालयीन स्नेही रुपाली घटे यांची आहे.