शहाणा

धरिता धरवेना,

सोडिता जगवेना,

कसे राहावे उमगेना--

नीतीची चाड,

परि खोटा मांड

कैशी द्यावी जोड---

तगून राहणे,

हिरीरी भांडणे

तसे संस्कार उणे--

राहावे पाण्यात,

परि पद्मपत्र

कैसे व्हावे---

जग जैसे तैसा

होता जो राहीला

एक तोचि वेडा---

जगी हो शहाणा

परि एकांतात

वेडातली दौड----