मन मोरपिस...

हाक सख्याची वेल्हाळ...

वाट ओढाळ ओढाळ...

पण भिवविते मला

असे भरले आभाळ !!

घन सावळे व्याकूळ

आज विरहात न्हाले...

आठवांत त्याच्या माझे

मन मोरपिशी झाले...!!