कृष्णसख्या रे तुझी बासरी
फ़ुलवीत आली लाख गोंदणे
अधिऱ्या स्पर्शी बहरुन गेली
वसंतातली आज पंचमी
ये ना छेडीत धून घननिळ्या
रास रंगवू आज मधुवनी
रंगबावरी गंधवेडी ही
तुझी राधिका तुला पुकारी
मुरलीच्या रे नादब्रम्ही या
थिरके अवघी पुलकीत काया
सरले मी-पण, कळले नाही
तूझ्या रंगी रे जीव दंगला........
शीला.