आजी....

माझी खूप खूप लाडकी आजी (माझ्या बाबांची आई) काही महिन्यांपूर्वी देवाघरी गेली. तिने निरोप घेतला त्या क्षणी आम्ही तिच्याजवळ होतो... त्या क्षणाची आठवण या चारोळीत बांधायचा प्रयत्न केलाय.....

देवघरात थरथरलेली एकाकी सांजवात...

अन हाती माझ्या आजीचा सुरकुतलेला मऊ हात ...

चेहऱ्यावर तिच्या स्थिरावलेली साता जन्मांची पुण्याई...

अन पापण्यांत आमच्या आठवणींची अखंड बरसात !!