एक अभावित कविता

सुखाचा मंत्र ..स्पर्श!
आठवण.. आपल्या हाती काहीच नसतं!
असाही संवाद:
"मी अनंत"..
"एकटी मी"
"एकटी मीही"
(ती ब्याद लांब गेली..)
काल रात्री
  पाउस १
  पाउस २
खरच...विचित्र
एकटी बाग.
तू सती?...आजी!
संदीप म्हणतो आयुष्यावर बोलू काही...
प्रतिसाद..शून्य!

आज दि.१७‌ सप्टेंबर ०७ रोजी 'मनोगत'च्या कविता विभागातील कवितांची शीर्षके खालून वर या पद्धतीने वाचतांना मला त्यात एक अभावित 'कविता' दिसली. ही शीर्षके मी फक्त आहेत  त्या क्रमाने पण 'वरून खाली' अशी लिहली व काही अवतरण चिन्हे 'पेरली' एव्हढेच. यातून दृष्य व गर्भित असे दोन्ही अर्थ, अभावित विनोद निघत असल्यास तो केवळ योगायोग समजावा. 
पण यातील अभावित कविता मात्र चोख़ंदळाना नक्कीच भावेल अशी आशा!
जयन्ता५२