खरंतर..
'मी'पण विसरुन प्रेम करण्यातच तो फसतो..
आणि असंच समजून बसतो, तिचंही तसंच असावं...
मग कधीतरी ती विचारते अचानक,
'तुझा काय संबंध..? तू आहेस कोण...?'
त्याला मग काही बोलताच येत नाही..
तो कोण आहे हेच सांगता येत नाही..
कारण..
तो विसरलेला असतो त्याचं 'मी' पण...
मग मागे उरतो कोण...?
एक शून्य... एकटाच..