संथ चाललंय नातं आपलं
नदीच्या भरलेल्या पात्रासारखं...
आपण मोबाईल, नातं तिथेच;
एखाद्या कव्हरेज क्षेत्रासारखं !!
***
छान जमलाय आता दोघांना
अनोळखी असल्याचा अविर्भाव
आठवण येते... आठवण जाते
आत सुरूच रेंजचा लपंडाव !!
***
मी तुला पाठवलेले सगळे एस. एम. एस.
ढगांत जाऊन हरवले...
सूर्याने मग शोधून त्यांना
सात रंगात गिरवले... !!
***