कुपन आणि अन्नदान

खुप वर्षांपुर्विची गोष्ट आहे. माझे  बाबा परभणीला राहत होते. तेव्हा ते एकटेच असल्याने त्यांनी मेस लावली होती. त्या मेसमध्ये कुपन सिस्टीम होती आणि बाबांचे एका महिन्यात जवळ जवळ १६ ते १८ कुपन्स राहिले होते. त्या मेसवाल्याने कुपन्स कॅरि फॉर्वरवर्ड करण्याचे कबुल केले होते. बाबांनी त्याला हि गोष्ट लक्षात आणून दिली कि कुपन्स उरलेलि आहेत तर ती मला पुढच्या महिन्यात कांटिन्यु करुन दे. तो म्हणाला "ते नाही जमणार तुम्ही काहिहि करा आणि आज शेवटचा दिवस आहे आज रात्रि सगळी कुपन्स सम्पवा. वाटल्यास गेस्ट आणा". काहिहि केल्या तो ऐकेना. बाबा म्हणाले "ठिक आहे पण मी आणेन त्या गेस्ट्सना तु जेवायला वाढले पहिजेस". तो ठिक आहे म्हणाला. बाबा गेले रेल्वे स्टेशनला, तिथल्या काहि भिकाऱ्यांना म्हणाले, "आज मी तुम्हाला जेवण देतोय चला". ते भिकारी खुश. आले बाबांच्या सोबत. मेसवर बाबा म्हणाले, "माझे गेस्ट आले आहेत त्यांना जेवायला वाढा". त्या गेस्टना बघुन तो नाही म्हणाला. पण बाबांनी त्याच्याकडुन कबुल करुन घेतल्याने त्याला कहिहि बोलता आले नाहि. पण ते गेस्ट बघुन बाकिचे लोक निघुन जाउ लागले. इकडे ते भिकारी कधी नव्हे ते खायला मिळाल्याने खुप खात होते इतके कि ४ माणसांचे जेवण १ माणुस खात होता. बाबा म्हणाले,"माझे अजुन काहि गेस्ट्स स्टेशनवर आहेत, मी त्यांना घेउन येतो". हे ऐकल्यावर तो मेसवाला म्हणाला, " बाबारे आता कोणाला आणु नकोस". बाबा म्हणाले, " असं कसं? कुपन्स संपायची आहेत अजुन! मी माझे कुपन्स असे कसे वाया जाउ देईन?". हे ऐकल्यावर तो माणुस फ़क्त चक्कर येण्याचा बाकी होता. त्याच्य लक्षात आले कि आपण जे करत आहोत ते चुक आहे. त्याने बाबांची माफ़ी मागुन सगळी कुपन्स कॅरी फ़ॉरवर्ड करुन दिली.