सात वर्षांच्या वरदाने नुकतीच केलेली कविता--( काय पण उत्साह आहे!)
एकदा एक परी
चुकून वाट चुकली
पळत पळत चंद्राकडे
पटकन गेली
परी म्हणाली चांदोबाला
चांदोमामा चांदोमामा
मला एक घर
बांधून देता का?
चंद्र म्हणाला वा,वा
गोड आहेस तू परी
बांधून देतो तुला घर
डोंगराच्या शिरी!