व्हेज मन्चुरीअन

  • पत्ता कोबी - २ कप
  • कोर्नफ़्लोअर - ५ चमचे
  • कांद्याची पात - १/४ कप
  • गाजर - १/४ कप
  • अद्रक - दिड इंच
  • लसूण - ७-८ पाकळ्या
  • सोया सॉस - १ चमचा
  • टोमॅटो सॉस -१ चमचा
  • चिली सॉस -१ चमचा
  • मीठ
  • तेल
  • हिरव्या मिरची -२-३
३० मिनिटे
२-३
  1. पत्ता कोबी, गाजर लांब-लांब बारीक चिरून घ्या.
  2. थोडी कोबी बाजूला काढून ठेवा.
  3. एका भांड्यात कोबी, चार चमचे कोर्नफ़्लोअर, मीठ, बारीक चिरलेला अद्रक, लसूण (४-५ पाकळ्या) चांगला मिसळून घ्या.
  4. पाणी न टाकता गोल गोल गोळे करा.
  5. गोळे तेलात तळून घ्या.
  6. कढईत थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला अद्रक, लसूण,हिरवी मिरची, कांद्याची पात,कोबी, गाजर परतून घ्या.
  7. दीड कप पाण्यात दीड चमचा कोर्नफ़्लोअर टाकून ते पाणी कढईत टाका.
  8. कढईत सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस प्रत्येकी एक चमचा टाका.
  9. उकळी आल्यावर त्यात गोळे सोडा.
  10. एक मिनिट थांबून गॅस बंद करा.
  1. कोबी, कोर्नफ़्लोअर, मीठ एकत्र केल्यावर लगेच पातळ होते. त्यामुळे लवकर गोळे करून तळून घ्यावे. प्रथम तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूनच पीठ मळावे.
माझे सुट्टीतील प्रयोग