विचारलाच कुणी तुला
कधी तुझा पत्ता
तर खुशाल कर वर्णन
दूरदेशीच्या एखाद्या घराचं,
एखाद्या ठिकाणाचं
तुझा सध्याचा पत्ता म्हणून
पण जेव्हा होईल विचारणा
तुझ्या कायमच्या पत्त्याची
तेव्हा मात्र बोल भरभरून
माझ्या हृदयाबद्दलच
कारण तू असशीलच तिथं
माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत
आणि त्यानंतरही कदाचित
कित्येक जन्म !