प्रेम नावाच्या गोंडस भानगडीत आहे

कधीचा भयाण त्रासाने पिडीत आहे

केव्हांचा खोल वेदनेशी निगडीत आहे

माझं दु:ख ऐकून, तुम्ही हसा चकटफू

प्रेम नावाच्या गोंडस भानगडीत आहे

सीमा प्रश्नाची इतकी वर्षे लाचारी

बॉंम्बचे व्रण देशाच्या थोबाडीत आहे

पर्यावरणाचा त्या समाजाच्या पुळका

ज्याचं वात्सल्य कॉंक्रीटच्या झाडीत आहे

दिवसेंदिवस कपडे कितीही तंग झाले

नारीची मोहकता फक्त साडीत आहे

फिल्टर सिगारेट खाक नशा आणते

झुरकेदार दम फक्त विडीत आहे

अख्खं जग राख करण्याचं सामर्थ्य

बोटाहून नकट्या काडीत आहे

कसले हिडस नृत्य प्रकार हल्लीचे

खरी कस झिम्मा नि फुगडीत आहे

झोपेच्या गोळ्या महलात जागरण देई

श्रमी कुटुंब शांत निजलं झोपडीत आहे

विस्की नि रमने फक्त हैंगओवर

चव नि नशा ताडी-माडीत आहे

न्यायाची कसली अपेक्षा बाळगावी

न्यायदेवताच पैशाच्या तागडीत आहे

सुप्रसिद्ध नायेकेचं अप्रसिद्ध प्रताप

म्हणे मिडीयाकडे एका सिडीत आहे

@सनिल पांगे