कुठे केलं तुम्ही मला, मनातून मुक्त अजून

कुठे केलं तुम्ही मला, मनातून मुक्त अजून

नशा उतरली जरी, प्याला नाही रिक्त अजून

खांदे उतरले जरी, नाही मी अशक्त अजून


माझ्या शांततेला नका, नपंसूकतेत मापू तुम्ही

हत्यार नाही टाकलं, चाखायचं रक्त अजून


दया नका दाखवू, पुन्हा उठीन ताकतीने

काय झालं चारचं, श्वास उरलेत फक्त अजून


नाही धावलास जरी, माझ्या हाकेला कधीही

कुठे पाहीलास माझ्यातला, खरा भक्त अजून


जरी दोरीनं बांधल, शांत पडलेल्या शरीरास

कुठे केलं तुम्ही मला, मनातून मुक्त अजून


@ सनिल पांगे