प्रेम असावे प्रेमासारखे
नको नुसते देह,
तिथे असावा प्रेमजिव्हाळा
नको नुसते मन,
त्या भावनांना अर्थ असावा
नको नुसती वासना,
मने जुळावीत एकमेकांची
नको नुसते सुर,
नयनातुनही प्रीत दिसावी
नको नुसते आश्रु,
या प्रेमातून जीवन मिळावे
नको नुसता म्रुत्यु,
आई-वडिलांचाही आशीर्वाद असावा
नको शिव्या-शाप,
दैवांची ही मर्जी असावी
नको क्षणाची साथ,
असे सर्वाथ्री प्रेम असावे
प्रेमसाठी प्रेम असावे.