दिव्यांची दिवाळी..

शतशतदिव्यांची व्हावी आरास

आसमंतात पसरावा त्यांचा प्रकाश

तेजोमय प्रकाशाने जीवन उजळावे

रिद्धी-सिद्धी ने आयुष्यभर सोबत राहावे

उत्तुंग यशाने हाती हात गुंफावा

तेजस्वी रहावा आपला आयुष्यरुपी दिवा

प्रकाशमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !