प्रीत!

शांत सारा परिसर
शिरशिर पाण्यावर
कमलीनी झाली दंग
कवेमध्ये घेई भृंग...

काठोकाठ भरे घट
अमृतात न्हाती ओठ
अनावर बाहूपाशी
ओसंडून वाहे काठ...

वारियाच्या तालावर
देठ मंद हले डुले
आत द्वैताची अद्वैती
प्रीत चिरंतन जुळे...