आणखी कविता वाचा.....
http://marathidesh.blogspot.com
अनेक ज्वलंत प्रश्नांचा धूर
गेला डोळ्यात अनेकांच्या
पण डोळे चोळण्यापलीकडे
कोणी काही केलं नाही
पण कुठेतरी लागलेली आग
दूरून पहात राहताना
स्वतःपर्यंत पसरत नाही
तोपर्यंत दूर्लक्ष करत जाताना
कधी पेटेल वणवा
येईल का सांगता?
सर्वच जळून जाईल
बाकी काही न राहता
मग हातात उचलून नुसतीच राख
एक आधीच शांत झालेली आग
आता आपल्या आश्रूंनी विझवण्यात
काय अर्थ आहे?
रोहन जगताप
‘पुढारी’ला पाठवलेल्या कवितांपॆकी एक.