शाळकरी प्रेम..
अन तू बसायची हुशार मुलींच्या रांगेत
मठ्ठ होतो मी ..
पण तू किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी
तू पसायदान किती सुंदर म्हणायचीस
माझ्या मरगळलेल्या चेहऱ्यावर
तू अनोखे तेज आनायचीस..
माझं नाव नेहमी ब्लकलिस्ट मध्ये दिसायचं..
तुझा नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फ़ेमस व्हायचं...
तुझं हे सत्र असंच कायम राहील..
माझं स्वप्न असच यशापासून दूर जात राहिलं..
तू संगीतात एक नंबर असायची
खेळामध्ये मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की
तू किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल,
एका नाटकात तू झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना
खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा
आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून
माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन
सगीतलं माझ्या ह्रिदयातलं,
तू म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझा मात्र रखरखीत उन्हातल...
तुझा ते वाक्य मला
खूप उशीराच कळले..
स्वप्न ते माझे प्रेमजिवनाचे
खरोखरी कापरापरी विरघळले..
आता मी कलेक्टर झालोय
हे तुला सांगू तरी कसं
तुझ्या सावलीतल्या घरकुलाशेजारी..
माझं झोपडं बांधू तरी कस?
तूच समजून घे सारं काही..
अन समजून घे थोडंसं मलाही..
अजूनही तुझीच वाट पाहतोय..
शाळेतल्या त्या प्रेमाला जपत तुझा होऊ पाहतोय...
----- आ.. आदित्य...