सर्व मनोगतींना नववर्षाच्या शुभेच्छा...
नववर्षा कडून असलेल्या अपेक्षा ... कविते रुपात खाली देत आहे.
गेले दोन हजार सात
आले दोन हजार आठ
घेवून नवी पहाट
मिळो सगळ्यांना प्रकाशाची वाट
यावी चांगुलपणाची लाट
लागो वाईटपणाची वाट
टाकूनी बेरोजगारीची कात
व्हावा मिळवता प्रत्येक हात
व्हावा भ्रष्टाचाराचा नायनाट
व्हावी भारताची भरभराट
तेवत राहावी जीवनाच्या दिव्याची वात ...
चांगूलपणाच्या मदतीसाठी पुढे यावेत
हजारो हात ...
हजारो हात...
वेलकम दोन हजार आठ ....