मी शोधतोय माझ्यातल्या नेहेमीच्या 'मी'ला
माझ्या सवयीच्या,रोजच्या 'मी'ला
हा कोण नवीनच मी
'मी मी' म्हणत पुढे येतोय?
असे आहेत अनेक मी माझ्यात.
प्रत्येकात आहेच मी थोडा थोडासा,
तरी या सर्वाना पचवून मी उरतोच बराचसा.
एक मी झालेला नकोसा
पण,बसलेला ठाण मांडून.
दुसरा मी हवाहवासा
बघेना माझ्याकडे ढुंकून...
एका 'मी'ला माझं अप्रूप
तर दुसरयाला मीच झालोय नकोसा !
एक मी, अभिमान वाटण्याजोगा
अन्य मी लपवून ठेवावासा....