(काहीच्या) काही चारोळ्या

१. सोबत कुणी असेल,
तर सिनेमा पहायला अर्थ आहे
एकट्यानेच पाहायचा असेल,
तर अंधारही `व्यर्थ' आहे!

२. गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे

३. आपण भेटायचो ते झाड आत
माझ्यासारखंच ताडमाड वाढलंय
तिथेच माझ्या मुलानं
माडीचं दुकान काढलंय!

४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...

५. मी तुझ्याकडे यायला निघते
पण तुझ्यापर्यंत पोचत नाही
वाटेत २-४ मित्र भेटल्यावर
त्यांनाही सोडवत नाही.

६. बोन्साय केलेल्या झाडालाही
एकदा पालवी फुटली
त्यालाही कळेना,
ही `वाढायची' जिद्द कुठली?

७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली

----------------