तुझी भेट

परवा तू भेटलास आणि वाटलं
सुकलेली फुलं, अलगद तळहातावर ठेवून,
दोन बोटांनी चुरगळली गेलीत
आणि थोडा-फार उरलेला सुवासही उडून गेला.

बरं झालं भेटलास ते,
आता तो चुरा,
फुंकर मारून उडवता येईल
असेही डायरीमध्ये नवी फुले ठेवायला
जागाच उरली नव्हती.

-अनामिका.