एकाकी
दूरदूर डोंगरकपारीत
चिमणा नितळ झरा----
उन्हात चमकणारा
पावसात नाचणारा
झाडाझुडुपात बागडणारा---
कधी ओढ्यात मिसळणारा
कधी नदीत विरघळणारा
कधी असीम स्वप्न ह्रदयाशी धरुन
समुद्राकडे झेपावणारा---
चिमणा नितळ झरा
दूरदूर डोंगरकपारीत मात्र
एकाकी---- तहानलेला----
- मुक्ता