लेकरू

लेकरू

.

ती इतकी निरागस!
ती इतकी सुंदर!
ती इतकी बोलकी!
ती इतकी चंचल!

तिच ते खट्याळ हसणं,
तिच सशावाणी उड्या मारणं,
तिच फुलपाखरा सारखं
कुणाही भोवती भिरभिरणं.

तिचं आई बरोबर
बोट धरून फिरणं..
तिच देवळात
तल्लीन होवून डोलणं..

तिच कुणाला ही
आपलंसं करणं...
तिच कुणात ही
मिसळून जाणं...

तिच माझ्या दिशेनं धावत येणं..
माझं घाबरत पुढे सरकणं
तिच्या आईच्या डोळ्यात
डोकावणारी काळजी, उदास खंत

एकदा बोलली ती माझ्याशी
आता मी आहे. पण माझ्या पुढं?
चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू
सांभाळू तरी कसं!!

स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८