मला जाग आली ती डोअर बेलने. मी दार उघडल तर एक टाय-कोट घातलेला मुलगा उभा होता.
"Good morning,Sir!!!". मी पण त्याला अभिवादन केलं.
"या, बोला काय काम आहे?" मी विचारलं.
"मी अमिताभजीं कडून आलो आहे. त्यांनी हा चेक दिला आहे. मला तुम्ही कॉंट्रॅक्टचे पेपर द्या."
मी त्याला नम्र शब्दात नकार दिला आणि दिलगीरी व्यक्त केली. पण तो एकायला तयार नव्हता. त्याने लगेच अमिताभला फोन लावला. अमिताभ मला परत समजावून सांगायला लागला.
"देखिए, आज हमारा परिवार आज क्या नही बेचता? आज हम कार, फोन, सीम कार्ड, तेल, साबण, पेंट, कपडे, चॉकलेट, हाजमा, , यहांतक की उत्तर प्रदेश भी बेचते है. शाहरूख भी अब ये सब बेचने लगा है. हम चाहते है की हम उससे आगे निकल जाये. बस आपकी मदद हो जाये!!!"
मी शेवटी होकार देउन टाकला. मला धन्यवाद देत अमिताभने फोन ठेवला. पेपर देउन त्या मुलाला मी घालवून दिले. सगळच विचित्र होतं. मी रिलॅक्स व्हायला टिव्ही लावला.
"Breaking News!!!! दिपिका अब मारेगी कॉक्रोच. रणवीर, शाहरूख भी देंगे साथ"
"सोप की ऍड करके उब गयी दिपिका!!!"
"क्यों दिपिका करती है कॉक्रोचसे नफ़रत!!!"
"दिपिका का दुश्मन कौन????"
प्रत्येक चॅनलवर अशा ब्रेकींग न्यूज येत होत्या. याचा अर्थ ह्या ऍडची बातमी प्रत्येकाकडे गेली होती. त्या दिवसापासून एजंसीवर ग्राहकांची, मॉडेल्सची रीघ लागली. येव्हढी गर्दी हाताळणे मुश्कील होउ लागलं.
मी जाहीरातीची थीम तयार केली. रणवीरच्या पेप्सीमध्ये झुरळ पडणार (मला रणवीरच्या पेप्सीत शाहरुखनेच झुरळ टाकायला लावलं). मग, वैतागलेली दिपिका शाहरुखला झुरळांबद्दल सांगणार. मग शाहरूख तीला टकले-मिशाळचं औषध देणार आणि तिघे मिळून झुरळं मारणार. शेवटी दिपिका एक मेलेलं झुरळ आणि औषधाचा स्प्रे हातात धरून जाहिरात संपवणार. सगळ्यांना थीम आवडली. आम्ही शुटचा दिवस नक्की केला.
त्या दिवशी आम्ही स्प्रे आणि झुरळ घेउन शुटला सुरूवात केली. अर्धी ऍड शुट झाली. आता दिपिकावर क्लायमॅक्स शुट करायचा होता. मी दिपिकाला सीन समजावून सांगायला लागलो.
"आपको एक हात में कॉक्रोच पकडना है और.."
"में कॉक्रोच पकडूंगी??????? छी!!!!!!"
"हां, लेकीन मरा हुआ!!"
"नही...में नहीं करूंगी ये सीन..."
"हे दिपिका...उंउंउंउंउंउंउं क्या हुआ उंउंउंउंउंउंउंउंउं" शाहरूख ने मध्येच नाक खुपसलं.
"देखोना शाहरूख, ये लोग मुझसे स्टंट करणे को बोल रहे है!!!!"
"काय, स्टंट????" मी दचकलो!!!
"कैसा स्टंट अंअंअंअंअंअंअंअं...???"
"ये लोग मुझे मरा हुआ कॉक्रोच पकडने को बोल रहे है....तुमही बताओ में कैसे करूं?? में कितना डरती हू.." दिपिका डोळयात पाणी आणून म्हाणाली..
"ऐसा करते है की प्लास्टीक का कॉक्रोच लातें है.." मी म्हणालो.
"नहीं, में वो भी नही पकडूंगी.." दिपिका एकायला तयार नव्हती.
"नहीं दिपिका, हम सीन चेंज करेंगे.." आता रणवीर पचकला... सीन चेंजच्या कल्पनेने टकले-मिशाळ अस्वस्थ झाले. मग मीच म्हंटलं. " ठिक है, कॉक्रोच का रोल कट करते है, आप सिर्फ स्पे पकडके पंच लाइन बोलो."
शाहरूख, दिपिका आणि रणवीर खुष झाले, पण ही कल्पना टकले-मिशाळना आवडली नाही. मी त्यांना special effects ची कल्पना सांगितली. मग तेही राजी झाले.
शेवटचा सीन पण चांगला झाला. एकंदर चांगली जाहीरात झाली. इकडे, दिपिकाने झुरळ पकडायला दिलेला नकार ऍश पर्यंत गेला. तीने मला स्वताः फोन करून आपण हा 'स्टंट' करणार आहोत असे सांगितले. मी थीम तयार केली. ठरल्या प्रमाणे स्टंट सहीत जाहिरात पण शुट केली. इकडे न्युज चॅनेल्सनी दिपिका-ऍश, शाहरूख-अमिताभ, रणवीर-अभिषेक असे सामने रंगवायला सुरूवात केली. सगळ्यांची लोकप्रियता वाढायला लगली होती.
दोन्ही जाहिराती टिव्ही वर यायला लागल्या. शाहरूख आणि अमिताभ असे दोन्ही कँप त्यांचीच जाहीरात लावयचा आग्रह करू लागले. दोन्ही जाहिरातींमुळे टकले-मिशाळांचं औषध प्रचंड खपायला लागलं. माझी एजंसीपण चांगली चालायला लागली. क्लायंटची गर्दी वाढली.
अचानक मला कोणाची हाक एकू आली. कोणितरी मला हाताने हलवत होतं.
"सर.. सर.. क्लायंट..."
"सर उठा, क्लायंट आलाय..."
मी डोळे उघडले. म्हणजे मला एकंदर स्वप्न पडलं होतं तर. मी डोळे चोळत समोर बघितलं. समोर दोन जणं उभे होते.
"नमस्कार!!!!" त्यांच्यातला एक म्हणाला.
मला त्या दोघांना बघितल्या सारखा वाटत होतं. त्यांचा आवाज पण एकल्यासारखा वाटत होता.
"... मी टकले आणि हे मिशाळ. आम्ही टकले मिशाळ लॅब्स मधून ......." पुढचं मला एकायला आलं नाही. मी तोपर्यंत बेशुद्ध पडून गेलो...........
*******************************************************
(समाप्त)