तावदानां बाहेरच जग
.
त्या दुधी काचांमधून
डोकावू पाहणारी
धाडसी सूर्य किरणं!!
आणि तशीच..
त्या अपारदर्शक तावदांना भेदून
बाहेरचा नजारा चितारू पाहणारी
माझी नजर!!
सारा आसमंत कोंडलेला
श्वास घेण्यासाठी
धडपडावं लागावं असा
त्या वातानुकूलित जागेतिल वातावरण
वार्याला ही अनुकूल नसावं.
त्या मुळेच बहुतेकं
भिजल्या मातीचा सुगंध
ओरबाडून काढून
मगच त्याला आत जाता येतं.
सूर्य किरणांना त्यांचं तेज विसरून
झगमगत्या दिव्यामध्ये विलीन व्हावं लागत.
स्वत:च अस्तित्व पूर्णं पणे विसरून
कोणती ही धडपड
आपलं मी पण गमावण्याची
आणि या धडपडीतुन हाशील काय व्हावं?
तर फक्त कोंडमारा
जीवघेणं नैराश्य
कसलीशी धुमसत राहणारी जाणीव.
स्वाती फडणीस ....................... १९९८