एक होते पिल्लू
रडू लागले मुळूमुळू
कोणी जवळ घेईना
म्हणून बाळाचे रडणे काही थांबेना..
तेवढ्यात त्या बाळाला त्याची आई दिसली
आईला बघून अंगात आणखीनच मस्ती शिरली
मनातला राग काही जाता जाईना
म्हणून बाळाचे रडणे काही थांबेना..
तेवढ्यात बाळाचे बाबा आले
येताना त्यांनी बाळासाठी चॉकलेट आणले.
चॉकलेट काही त्या बाळाला खाता येईना
म्हणून बाळाचे रडणे काही थांबेना..
शाळेतून आली ताई लहान
बाळाला फिरवले बागेत छान
बाहेर बाळाला काहीच आवडेना
आणि काय माहित बाळाचे रडणेच काही थांबेना..
रडतय छोटू बाळ
त्रासलय बाळ
काही खायचे नाही पिल्लूला
मग हवे तरी काय बाळाला...?
झोपलेली आजी जागी झाली
बाळाला घेउन देऊळात गेली
देवबाप्पाला पाहून बाळ लागले हसू
देवबाप्पा त्याला म्हणाला अशे नाही पलत रूसू ...
गिरीश...