हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..
भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली….
हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले…?
पाखरु मनाचे शोधीती आसरा…..
हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..
फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास…
हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा…….
हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..
-सचिन काकडे [मार्च १७, २००८]
फक्त तुझ्यासाठीच “हा खेळ सावल्यांचा”