'रु' ची कविता (२ कडवी)

स्कायस्क्रेपरखालती चिरडे डोळ्यांमधला अश्रू

बाकावरती बसुनि शहर हे निवांत करिते श्मश्रू ॥१॥

ठण् ठण्  वाजे तास चुकेना रोज घडे रुबरु

काळाच्या घनतळ्यात गळले जगण्याचे घुंगरू ॥२॥

-----अभय अरुण इनामदार.