ते सावल्यांचे गीत होते........

ह्या मावळतीचा रंग केशरी
स्मरणांचाही आला थवा
जो धुसर,कातरी,आठववेडा
क्षणही तो झाला नवा

श्वास-फ़ुलांच्या मातीवरती
अशी सणाणत आली वीज
दाही दिशांना झंकार झाला
क्षणात स्थिरले अवघे क्षीतीज

कीणकिणत्या नादानी सरींच्या
पुन्हा स्वरांना जाग आली
का देतो ओलेपण नको-नकोसे?
सर हसत्या एकांतास म्हणाली

म्हणे या भासांच्या धुद लहरी
हा गंध खोटा, हे रंगही खोटे
विशुदध रुप नव्या थेंबांचे
तळ्यात निर्मळ नशा लोटे

अजुन ती चाहुल विजांची
सये, सुर तुझे वेचीत येते
गुंजले जे मघा दिगंतरी
ते सावल्यांचे गीत होते....
ते सावल्यांचे गीत होते....

-सचिन काकडे [ मार्च २९,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”