आंदोळा हिंदोळा
झुले झुले झुला
झुल झुले झुला
जाई जाई आभाळा
जाई आभाळा
आगे मागे आंदोळा
आंदोळा हिंदोळा
नभी चांदण गाव
पाई फुलली बाग
मनी चांदण भुल
मनं चांदण फुल
पायी लावून रेटा
म्हणे आकाश गाठा
जोरकस दोर असा
त्याचा मागे मागे ओढा
आगे मागे जाता
आंदोळा हिंदोळा
जीव गुंगला पेंगला
जीव रंगला रमला
झुले झुले झुला
झुल झुले झुला
चांदण गाव माझा
फुला फुलात वसला
आंदोलनी रमला
जीव गुंगला रंगला
जीव फुलला भुलला
जीव गुंगला झिंगला
आगे मागे झुला
हिंदोळा आंदोळा
ना आकाश ना फुल
झुल्याची रे भुल
झुल झुल झुला
झुले झुले झुला
झुले झुले झुला
झुल झुले झुला
हिंदोळा आंदोळा
आंदोळा हिंदोळा
झुले झुले झुला
झुल झुले झुला
स्वाती फडणीस .................... १९-०४-२००८