बकुळगंध..

मला एक सांग आधी...

मातीत पडलेल्या बकुळफुलाची,

माती झटकून टाकशील..

मातीला लागलेला बकुळगंध

झटकू शकशील कधी? ..

पाळंदीवर उमललेली रानफुलं,

कोमेजतील; नाही तर, खुडून टाकशील..

चांदण्यांची फुलं,

मावळतील कधी?....