ओठात सांजवेळी तु, सुर होऊनी येते
मोजुन श्वास माझे, माझे मलाच देते !!
सरी तुझ्या स्वरांच्या आसवांच्या ओळी
ओल्या सरीसवे तु, थेंब थेंब झरते !!
या भिजल्या स्वरांना देउ नकोस साद
भास द्याया पुरे गं, माझी मलाच गीते !!
मी मोजतो दुरावे, मी शोधतो पुरावे
अंतरही हात धरुनी मजला दुरात नेते !!
तो श्वास गुंतलेला, तो सुर संपलेला
ते इशारे क्षणांचे, सारे मलाच होते !!
त्या धुंदमंद राती, तुही नशाच होती
कोरडीच नशा आज, पेले माझेच रीते !!
--सचिन काकडे [ मे २,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”